Tuesday, February 19, 2013

नसती उठाठेव


मोठे होते झाड वाकडे,
तिथे खेळती दोन माकडे
गंमत झाली भारी बाबा,
गंमत झाली भारी

खरखर खरखर सुतारकाका,
कापीत होते एक ओंडका
भुरभुर भुरभुर भुसा उडाला,
माकड मज्जा पाहू लागला

निम्मे लाकूड चिरुन झाले,
दुपार होता काम थांबले
पाचर ठोकून सुतार गेले,
खावयास भाकरी

माकड टुणकन खाली आले,
पाचर हलवूनी काढु लागले
शहाणे दुसरे त्यास बोलले,
धोक्याचे हे काम न आपुले

पहिले आपला हट्ट न सोडी,
जोर लावूनी पाचर काढी
फटित अडके शेपूट तेव्हा,
माकड हाका मारी

उठाठेव ही नसती सारी,
सुतार त्याला फटके मारी
म्हणून करावा विचार आधी,
नंतर कामे सारी

-

Saturday, July 14, 2012

कशी करु स्वागता


कशी करु स्वागता
एकांताचा आरंभ कैसा, असते कशी सांगता

कशी हसू मी कैसे बोलू
किती गतीने कैसी चालू
धीटपणाने मिठी घालू का, कवळू तुजला का

फुलते कळी की, फुलवी वारा
चंद्र हसवी की, हसवी तारा
कुठले आधी, कुठले नंतर, येई ना सांगता

कुणी ना पुढती, कुणी ना पाठी
घरात आहे मीच एकटी
प्रथम दर्शनी बोलायाचा भाव तरी कोणता

गीतकार - ग. दि. माडगुळकर
संगीतकार - सुधीर फडके
चित्रपट - मुंबईचा जावई - 1970

Monday, June 18, 2012

पैठणी


फडताळात एक गाठोडे आहे; त्याच्या तळाशी अगदी खाली
जीथे आहते जुने कपडे, कुंच्या, टोपडी शेले शाली

त्यातच आहे घडी करुन जपनू ठेवलेली एक पैठणी
नारली पदर, जरी चौकडी, रंग तीचा सुंदर धानी.

माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती
पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरुन हाती

पैठनीचया अवती भवती दरवळणारा सुक्ष्म वास,
ओळखीची ..अनोळखीची ..जाणीव गूढ़ आहे त्यास.

धुप.. कापूर..उदबत्यातून जलत गेले कीती श्रावण
पैठनीने या जपले एक तन एक मन ..

खस-हीन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची, चमेलीची आरास पदाआडून हसली

वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा स्त्राव झाला,
नवा कोरा कडक पोत एक मउपणा ल्याला

पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलघडत गेले
अहेवपणी मरण आले, माझ्या आजीचे सोने झाले.

कधीतरी ही पठैणी मी धरते उरी कवळून
मऊ-रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून

मधली वर्षे गळून पडतात, कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकडानो आजीला माझे कुशल सांगा....

शांता शेळके

Sunday, March 11, 2012

रंगपंचमीच्या शुभेच्छा

फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो, रंगपंचमी म्हणजे रंगाचा सण, आज या रंगपंचमी ला आपणही सर्वजण या रंगात न्हाऊन निघुयात आणि रंगांचा आनंद लुटुया.


रंगपंचमीच्या सर्वांना रंगीबेरंगी शुभेच्छा. 

Tuesday, March 6, 2012

होळीच्या शुभेच्छा

सर्व ब्लॉग वाचकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.


चला तर या फाल्गुनी पौर्णिमेला आपणही प्रतीकात्मक होलिका दहन करुन सर्व दुर्गुणांचा विनाश व्हावा अशी प्रार्थना करूयात.