सर्वात्मका, शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना
तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना ॥ धृ. ॥
सुमनांत तू, गगनांत तू
तार्यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामध्ये
सर्वांत त्या वसतोस तू
चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना ॥ १ ॥
श्रमतोस तू शेतामध्ये
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले अन गांजले
पुसतोस त्यांची आसवे
स्वार्थावीना सेवा जिथे तेथे तुझे पद पावना ॥ २ ॥
करुणाकरा करुणा तुझी
असता मला भय कोठले?
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउले
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना ॥ ३ ॥
- कुसुमाग्रज

if u have an audio of this poem, can you please send it to me?
ReplyDeleteशाळेत नियमित होणारी आणि माझ्या हृदयाला भिडलेली कुसुमाग्रजांनी रचलेली हि अजरामर प्रार्थना आजन्म स्तवली जाईल

ReplyDeleteन्यायार्थ जे लढती रणी
ReplyDeleteतलवार तू त्यांच्या करी
ध्येयार्थ जे तमी चालती
तू दीप त्यांच्या अंतरी
ज्ञानार्थ जे तपती मुनी होतोस त्यांची साधना ॥
हे कडवं पण आहे शेवटून दुसरं...
Thanks
Deleteमाझी फेवरिट व heart touching poem मला माझे बालपण आठवून देते. अप्रतीम!
ReplyDeleteReads frequently!
DS Deshmukh
DeleteNyc poem
ReplyDeleteVery peaceful poem
ReplyDeleteMy favorite poem by great poet Kusumagraj
ReplyDeleteMy favourite to from my school bal sanskar vidya mandir yawal
ReplyDeleteमाझी आवडती कविता
ReplyDeleteशाळेत प्रार्थनेच्या वेळी म्हणायचं आम्ही
मला खूप आवडते ही कविता
अर्थपूर्ण हृदयाला भिडणारी
शाळेत नियमित होणारी आणि माझ्या पण हृदयाला भिडलेली कुसुमाग्रजांनी रचलेली हि अजरामर प्रार्थना आजन्म स्तवली जाईल
ReplyDeleteलहानपणी शाळेत असताना दररोज म्हणायचो कुसुमाग्रजांची ही कविता मला आज ही खुप आवडते
ReplyDelete