Tuesday, June 28, 2011

पुन्हा पावसालाच सांगायचे... - गारवा

पुन्हा ढग दाटून येतात, पुन्हा आठवणी जाग्या होतात
तिचे माझे सारेच पावसाळे, माझ्या मनात भिजून जातात

पुन्हा पाऊस ओला ओला, पुन्हा पाऊस बांधून झूला
तिच्याकडले उरले झोके, परत करतो माझे मला
पुन्हा पाऊस खूप ऐकतो, पुन्हा पाऊस खूप बोलतो
त्याच्या माझ्या गप्पांमधले तिचे थेंब अलगद झेलतो

पुन्हा पावसाला सांगतो मी, पुन्हा पावसाशी बोलतो मी
माझे तिचे आठवण थेंब, पुन्हा पावसालाच मागतो मी

--------------------------------------------------------------------------------------------
  
पुन्हा पावसालाच सांगायचे
कुणाला किती थेंब वाटायचे

मऊ कापसाने दरी गोठली
ढगांनी किती खोल उतरायचे

घराने मला आज समजावले
भिजूनी घरी रोज परतायचे

तुझी आसवे पाझरु लागता
खर्‍या पावसाने कुठे जायचेगीत: मिलिंद इंगळे

No comments:

Post a Comment