Wednesday, September 21, 2011

सर्वात्मका शिवसुंदरा

सर्वात्मका, शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना
तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना ॥ धृ. ॥

सुमनांत तू, गगनांत तू
तार्‍यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामध्ये
सर्वांत त्या वसतोस तू
चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना ॥ १ ॥

श्रमतोस तू शेतामध्ये
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले अन गांजले
पुसतोस त्यांची आसवे
स्वार्थावीना सेवा जिथे तेथे तुझे पद पावना ॥ २ ॥

करुणाकरा करुणा तुझी
असता मला भय कोठले?
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउले
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना ॥ ३ ॥

- कुसुमाग्रज

11 comments:

 1. if u have an audio of this poem, can you please send it to me?

  ReplyDelete
 2. शाळेत नियमित होणारी आणि माझ्या हृदयाला भिडलेली कुसुमाग्रजांनी रचलेली हि अजरामर प्रार्थना आजन्म स्तवली जाईल

  ReplyDelete
 3. शाळेत नियमित होणारी आणि माझ्या हृदयाला भिडलेली कुसुमाग्रजांनी रचलेली हि अजरामर प्रार्थना आजन्म स्तवली जाईल

  ReplyDelete
 4. शाळेत नियमित होणारी आणि माझ्या हृदयाला भिडलेली कुसुमाग्रजांनी रचलेली हि अजरामर प्रार्थना आजन्म स्तवली जाईल

  ReplyDelete
 5. न्यायार्थ जे लढती रणी
  तलवार तू त्यांच्या करी
  ध्येयार्थ जे तमी चालती
  तू दीप त्यांच्या अंतरी
  ज्ञानार्थ जे तपती मुनी होतोस त्यांची साधना ॥

  हे कडवं पण आहे शेवटून दुसरं...

  ReplyDelete
 6. माझी फेवरिट व heart touching poem मला माझे बालपण आठवून देते. अप्रतीम!
  Reads frequently!

  ReplyDelete
 7. My favorite poem by great poet Kusumagraj

  ReplyDelete
 8. My favourite to from my school bal sanskar vidya mandir yawal

  ReplyDelete