Monday, September 26, 2011

लवथवती विक्राळा - शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥१॥

जयदेव जयदेव जय श्रीशंकरा
आरती ओवाळूं तुज कर्पुरगौरा ॥धृ॥

कर्पुरगौरा भोळा नयनीं विशाळा
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥२॥

देवी दैत्यी सागर मंथन पैं केले
त्यामाजी अवचित हळहळ जें उठलें
तें त्वां असुरपणें प्राशन केले
'नीलकंठ' नाम प्रसिध्द झाले ॥ ३॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी
रघुकुळटिळक रामदासा अंतरी ॥४॥

No comments:

Post a Comment