Monday, September 26, 2011

दुर्गे दुर्घट भारी - देवीची आरती


दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी
वारी वारी जन्म मरणांते वारी
हारी पडलों आतां संकट निवारी ॥१॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी
सुरवर-ईश्वरवरदे तारक संजिवनी ॥धृ॥

त्रिभुवन भुवनी पाहतां तुजऐशी नाही
चारी श्रमले परंतु न बोलवे काही
साही विवाद करितां पडले प्रवाही
ते तु भक्तांलागी पावसि लवलाही ॥२॥

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां
क्लेशांपासुनि सोडविं तोडीं भवपाशा
अंबे तुजवांचुन कोण पुरविल आशा
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥३॥

No comments:

Post a Comment