Monday, September 26, 2011

उत्कट साधुनि - रामाची आरती


उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी ।
लिंगदेहलंकापुर विध्वंसूनी ॥
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।
देह अहंभाव रावण निवटोनी ॥१॥

जयदेव जयदेव निजबोध रामा ।
परमार्थें आरती सद्भावे आरती परिपूर्णकामा ॥धृ॥

प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला ।
लंकादहन करुन‍ी अखया मारिला ॥
मारिला जंबूमाळी भुवनि ञाहाटीला ।
आनंदाची गूढी घेउनियां आला ॥२॥

निजबळें निजशक्ती सोडविली सीता ।
म्हणुनी येणें झालें अयोध्ये रघुनाथा ।
आनंदे वोसंडे वैराग्य भरता ।
आरती घेउनि आली कौसल्यामाता ॥३॥

अनुहतध्वनि गर्जति अपार ।
अठरा पद्में वानर करिती भुभुःकार ।
अयोध्येसी आले दशरथकुमार ।
नगरी होत आहे आनंद थोर ॥४॥

सहजसिंहासनीं राजा रघुवीर सोहंभावे तया पूजाउपचार ।
सहजांची आरती वाद्यांचा गजर ।
माधवदासस्वामी आठव ना विसर ॥५॥

No comments:

Post a Comment