Showing posts with label अनामिक. Show all posts
Showing posts with label अनामिक. Show all posts

Tuesday, February 19, 2013

नसती उठाठेव


मोठे होते झाड वाकडे,
तिथे खेळती दोन माकडे
गंमत झाली भारी बाबा,
गंमत झाली भारी

खरखर खरखर सुतारकाका,
कापीत होते एक ओंडका
भुरभुर भुरभुर भुसा उडाला,
माकड मज्जा पाहू लागला

निम्मे लाकूड चिरुन झाले,
दुपार होता काम थांबले
पाचर ठोकून सुतार गेले,
खावयास भाकरी

माकड टुणकन खाली आले,
पाचर हलवूनी काढु लागले
शहाणे दुसरे त्यास बोलले,
धोक्याचे हे काम न आपुले

पहिले आपला हट्ट न सोडी,
जोर लावूनी पाचर काढी
फटित अडके शेपूट तेव्हा,
माकड हाका मारी

उठाठेव ही नसती सारी,
सुतार त्याला फटके मारी
म्हणून करावा विचार आधी,
नंतर कामे सारी

-

Tuesday, May 17, 2011

स्वप्न...

स्वप्नात एकदा मी देवाला विचारलं,
नशीबाच पुस्तक तुच कारं लिहायच ?
मी पान उलगडायचं,अन जगानं ते वाचायचं,
पानंच संपत आल्यावर .. पुस्तक तुच बंद करायचं,
जगाच्या मोठया पसाय्रातुन एकटं नेऊन जाळायचं !!

देवाचं उत्तरं
तुला कुणी सांगीतलयं, फ़क्त पानं उलगडायला,
मी कधी नाही म्हट्लयं ,
माझ पान फ़ाडायला, अन तुझ पान जोडायला?
तुझं नशीब तुझ तुच लिहयचं
आता तुच ठरवं,नावासहित मरायचं की
नावं माग ठेऊन जगायचं.............

या कवितेच्या कवीचं नाव माहित नसल्याने अनामिक लिहित आहे.