Showing posts with label गीत. Show all posts
Showing posts with label गीत. Show all posts

Saturday, July 14, 2012

कशी करु स्वागता


कशी करु स्वागता
एकांताचा आरंभ कैसा, असते कशी सांगता

कशी हसू मी कैसे बोलू
किती गतीने कैसी चालू
धीटपणाने मिठी घालू का, कवळू तुजला का

फुलते कळी की, फुलवी वारा
चंद्र हसवी की, हसवी तारा
कुठले आधी, कुठले नंतर, येई ना सांगता

कुणी ना पुढती, कुणी ना पाठी
घरात आहे मीच एकटी
प्रथम दर्शनी बोलायाचा भाव तरी कोणता

गीतकार - ग. दि. माडगुळकर
संगीतकार - सुधीर फडके
चित्रपट - मुंबईचा जावई - 1970

Tuesday, December 27, 2011

केतकीच्या वनी तिथे

केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर
गहिवरला मेघ नभी सोडला गं घीर ||

पापणीत साचले अंतरात रंगले
प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले
ओठावरी भिजला गं आसावला सूर ||

भावपुर्ण रात्रीच्या अंतरंगी डोलले
धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले
डोळियात पाहिले रे कौमुदीत नाचले
स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरासुरात थांबले
झाडावरी दिसला गं भारला चकोर ||

गायिका: सुमन कल्याणपुर
संगीतकार: अशोक पत्की
गीतकार: अशोक परांजपे

वेडात मराठे वीर दौडले सात

म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात निमिषात

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात

खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी
गदीर्त लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात

दगडावर दिसतील अजूनि तेथल्या टाचा
ओढयात तरंगे अजूनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणी वार्यावर गात

निश्चयाचा महामेरु

निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी

नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती
पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा

आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी

धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले

देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली

या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे

कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा.

Monday, December 5, 2011

चंद्र आहे साक्षीला

पान जागे फुल जागे, भाव नयनी जागला
चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला

चांदण्याचा गंध आला, पौर्णिमेच्या रात्रीला
चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला

स्पर्श हा रेशमी, हा शहारा बोलतो
सूर हा, ताल, हा, जीव वेडा डोलतो
रातराणीच्या फुलांनी, देह माझा चुंबिला

लाजरा, बावरा, हा मुख चंद्रमा
अंग का चोरिसी, दो जीवांच्या संगमा
आज प्रीतीने सुखाचा, मार्ग माझा शिंपिला

संगीत - सुधीर फडके
गायक - आशा भोसले, सुधीर फडके
चित्रपट - चंद्र आहे साक्षीला (१९७८)

मी डोलकर


मी डोलकर, डोलकर, डोलकर दयार्चा राजा
घर पान्यावरी, बंदराला करतो ये जा

आयबापाची लाराची लेक मी लारी
चोली पिवली गो, नेसलय अंजिरी सारी
माज्या केसान गो मालीला फुलैला चाफा
वास परमाळता वार्‍यान घेतय झोका
नथ नाकान साजिरवानी
गला भरुन सोन्याचे मनी
कोलीवार्‍याची मी गो रानी
रात पुनवेला, नाचून करतय मौजा

या गो, दर्याचा दरारा मोठा
कवा पान्यावरी उठतान डोंगर लाटा
कवा उदानवारा शिराला येतय फारु
कवा पान्यातूनी आभाला भिरतंय तारु
वाट बगून झुरते पिरती
मंग दर्याला येते भरती
जाते पान्यान भिजून धराती
येते भेटाया तसाच भरतार माजा

भल्या सकालला आभाल झुकतंय हे खाली
सोनं चमचमतंय दर्याला चढते लाली
आमी पान्यामंदी रापण टाकतो जाळी
धन दर्याचं लुटून भरातो डाली
रात पुनवेचं चांदन प्याली
कशी चांदीची मासोली झाली
माज्या जाल्यात होऊन आली
नेतो बाजारा भरुन म्हावरा ताजा

गीतकार - शांता शेळके
गायक - लता - हेमंत कुमार
संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय..


गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?
माझ्या पिरतीची रानी तू होशील काय ?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय !
तुझ्या पिरतीची रानी मी होणार नाय !

ग तुझं टप्पोरं डोलं, जसं कोल्याचं जालं
माझं कालिज भोलं, त्याच मासोली झालं
माझ्या प्रीतीचा, सुटलाय तुफान वारा वारा वारा
रं नगं दावूस भलताच तोरा, जा रं गुमान साळसूद चोरा
तुझ्या नजरंच्या जादूला, अशी मी भुलणार नाय

रं माझ्या रूपाचा ऐना, तुझ्या जीवाची दैना
मी रे रानाची मैना, तुझा शिकारी बाणा
खुळा पारधी ग, जाळ्यामंदी आला आला आला
ग तुला रुप्याची नथ मी घालीन
ग तुला मिरवत मिरवत नेईन
तुज्या फसव्या या जाल्याला, अशी मी गावनार नाय

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार ......हाय !
तुझ्या पिरतिचि रानी मी होनार हाय !

गीत - सुधीर मोघे,
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
गायक - आशा भोसले
चित्रपट - हा खेळ सावल्यांचा (१९७६)

Wednesday, November 9, 2011

अरे संसार संसार

 
अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर !

अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नहीं
राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नहीं

अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं
येड्या, गयांतला हार, म्हनू नको रे लोढनं !

अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड

अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा

देखा संसार संसार, शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे, मधी चिक्ने सागरगोटे

ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार
देतो सुखाले नकार, अन्‌ दुःखाले होकार

देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार !

अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार

असा, संसार संसार, आधी देवाचा ईसार
माझ्या देवाचा जोजार, मग जीवाचा आधार !

- बहिणाबाई चौधरी

Monday, October 24, 2011

स्वरगंगेच्या काठावरती


स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला
गतजन्मीची खूण सापडे, ओळखले का मला

वदलीस तू, मी सावित्री ती
शकुंतला मी, मी दमयंती
नाव भिन्न तरी मी ती प्रिती
चैतन्याचा ऊर तेधवा गंगेला पातला
स्वरगंगेच्या काठावरती ...

अफाट जगती जीव रजःकण
दुवे निखळता कोठून मिलन
जीव भुकेला हा तुज वाचून
जन्मांमधूनी पिसाट फिरता, भेट घडे आजला
स्वरगंगेच्या काठावरती ...

एक लाजरा न्‌ साजरा मुखडा


एक लाजरा न्‌ साजरा मुखडा, चंद्रावानी खुलला गं
राजा मदन हसतोय कसा, की जीव माझा भुलला गं
ह्या एकांताचा तुला इशारा कळला गं
लाज आडवी येती मला, की जिव माझा भुलला गं

नको रानी नको लाजू, लाजंमदी नको भिजू
हितं नको तितं जाऊ, आडोशाला उबं र्‍हाऊ
का? ... बघत्यात !

रेशीम विळखा, घालुन सजना, नका हो कवळून धरू
लुकलुक डोळं, करुन भोळं, बगतंय फुलपाखरू
कसा मिळावा पुन्हा साजनी मोका असला गं

डोळं रोखून, थोडं वाकून, झुकू नका हो फुडं
गटर्गुम गटर्गुम करून कबूतर बघतंय माज्याकडं
लई दिसानं सखे, आज ह्यो धागा जुळला गं

बेजार झाले सोडा सजणा, शिरशिरी आली अंगा
मधाचा ठेवा लुटता लुटता, बघतोय चावट भुंगा
मनात राणी तुझ्या कशाचा झोका झुलला गं ?

गायक/गायिका -अरुण सरनाईक / उषा मंगेशकर
संगीतकार - राम कदम
गीत - जगदीश खेबुडकर
चित्रपट - चंदनाची चोळी अंग अंग जाळी

उठी उठी गोपाला


मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला
स्वीकारावी पूजा आता, उठी उठी गोपाला

पूर्व दिशेला गुलाल उधळुन, ज्ञानदीप लाविला
गोरस अर्पुनि, अवघे गोधन गेले यमुनेला

धूप दीप नैवेद्य असा हा षडोपचार चालला
रांगोळ्यानी सडे सजविले, रस्त्यारस्त्यातून

सान पाउली वाजति पैंजण छुन छुन्न छुन छुन
कुठे मंदिरी ऐकू येते, टाळांची किणकिण

एकतानता कुठे लाविते एकतारिची धून
निसर्गमानव तुझ्या स्वागता असा सिद्ध जाहला

राजद्वारी घडे चौघडा शुभ:काल जाहला
सागरतीरी ऋषीमुनींचा वेदघोष चालला

वन वेळूंचे वाजवि मुरली छान सूर लागला
ररूशिखरावर कोकिलकविने पंचम स्वर लाविला

गायक - कुमार गंधर्व
गीत - बाळ कोल्हटकर
चित्रपट - देव दीनाघरी धावला

अरे खोप्यामधी खोपा

अरे खोप्यामधी खोपा
सुगरनीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला..

पिलं निजले खोप्यात
जसा झूलता बंगला
तिचा पिलामधि जीव
जीव झाडाले टांगला..!

सुगरिन सुगरिन
अशी माझी रे चतुर
तिले जल्माचा सांगाती
मिये गन्यागम्प्या नर

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा !

तिची उलूशीच चोच,
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं ?

- बहीणाबाई चौधरी

Wednesday, October 5, 2011

चंदाराणी, का गं दिसतेस थकल्यावानी

चंदाराणी, का गं दिसतेस थकल्यावानी

शाळा ते घर, घर ते शाळा, आम्हा येतो कंटाळा
रात्रभर तू चाल चालसी, दिवसातरी मग कोठे निजसी

वारा वादळ छप्पन वेळा, थारा नाही आभाळा
कसा गडे तू तोल राखिसी, पुढती पुढती पाय टाकिसी

काठी देखील नसते हाथी, थोडी नाही विश्रांती
चढती कैसी, कशी उतरसी निळ्या डोंगरी अखंड फिरशी

वाडा घरकुल घरटे नाही, आई नाही अंगाई
म्हणूनिच का तू अवचित दडसी, लिंबामागे जाऊन रडसी

गायक - आशा भोसले

रजनीगंधा जीवनी या बहरुनी आली

रजनीगंधा जीवनी या बहरुनी आली
मनमीत आला, तिच्या पाऊली

फुलल्या मनाच्या मुक्या पाकळया
झुलल्या लता आज प्रीतीतल्या
अशी आली, प्रीती ल्याली, नवी ही कळी

रजनी अशी ही निळी सावळी
किरणांत न्हाली धरा मलमली
अशा वेळी, प्रिया येई, फुले लाजली

गीतकार - शांताराम नांदगावकर
गायक - अनुराधा पौडवाल
संगीतकार - अनिल - अरुण

दिसते मजला सुखचित्र नवे

दिसते मजला सुखचित्र नवे, मी संसार माझा रेखिते

प्रीत तुझी माझी फुलावी, या फुलत्या वेलीपरी
भाव मुके ओठांत यावे, गंध जसा सुमनांतरी
शब्दाविना मन भावना, अवघ्याच मी तुज सांगते

हात तुझा हाती असावा, साथ तुझी जन्मांतरी
मी तुझिया मागून यावे, आस ही माझ्या उरी
तुज संगती क्षण रंगती, निमिषात मी युग पाहते

स्वर्ग मिळे धरणीस जेथे, रंग नवे गगनांगणी
सप्तसूरा लेऊन यावी, रागिणी अनुरागिणी
तुझिया सवे सूख-वैभवे, सौभाग्य हे नित मागते

प्रथम तुझ पाहता

प्रथम तुझ पाहता, जीव वेडावला
उचलूनी घेतले, निजरथी मी तुला

स्पर्श होता तूझा, विसरलो भान मी
गूढ श्वासातला प्राशीला गंध मी
नयन का देह ही मिटून तू घेतला

जाग धुंदीतूनी मजसी ये जेधवा
कवळूनी तुजसी मी चुंबिले तेधवा
धावता रथपती पळभरी थांबला

गीतकार - ग. दि. माडगुळकर
संगीतकार - सुधीर फडके
चित्रपट - मुंबईचा जावई - 1970

Tuesday, October 4, 2011

ताई मला सांग

कोण येणार ग पाहुणे
ताई मला सांग मला सांग कोण येणार गं पाहुणे

आज सकाळपासून गं, गेली ताईची घाई उडून
आरशासमोरी बसून आहे बुवा ऐट
घाल बाई नवे दागिने

झाली झोकात वेणी फणी
नविन कोरी साडी नेसूनी
ताई माझी जरी दिसे देखणी
गोरे गोरेपान तेही आहेत सुंदर म्हणे

नको सांगूस जा मला
मीच मज्जा सांगते तुला
गोड गोड खाऊ मला देतील नवे मेहुणे

गायक - आशा भोसले

वारा गाई गाणे

वारा गाई गाणे, प्रीतीचे तराणे
धुंद आज वेली, धुंद फुल पाने

रंग हे नवे, गंध हे नवे
स्वप्न लोचनी वाटते हवे
हा निसर्ग भासे, विश्वरुप लेणे

या निळया नभी, मेघ सावळे
कल्पनेस मी पंख लाविले
झेलते पिसावरी, हे सतेज सोने

आज वेड हे कुणी लाविले ?
अंतराळी का पडती पाऊले ?
कशी सोडवू मी सुखाचे उखाणे ?

गीतकार - जगदीश खेबुडकर
गायक - लता मंगेशकर
संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट - संसार

ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर

ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले
मला हे दत्तगुरु दिसले

माय उभी ही गाय होऊनी, पुढे वासरु पाहे वळुनी
कृतज्ञतेचे श्वान बिचारे, पायावर झुकले

चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटा मधुनी हृदयपाखरु, स्वानंदी फिरले

तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया
तुमच्या हाती माझ्या भवती, औदुंबर वसले

गायक - आशा भोसले
संगीतकार - सुधीर फडके
चित्रपट - आम्ही जातो आमुच्या गावा

आला आला वारा

आला आला वारा, संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा, सया निघाल्या सासुरा

नव्या नवतीचं बाई, लकाकतं रुप
माखलं गं ऊनं, जनू हळदीचा लेप
ओठी हासू, पापणीत आसवांचा झरा

आजवरी यांना किती जपलं, जपलं
काळजाचं पानी किती शिपलं, शिपलं
चेतवून प्राण यांना, दिला गं उबारा

गीतकार - सुधीर मोघे
गायक - आशा, अनुराधा पौडवाल
संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट - हा खेळ सावल्यांचा