Monday, May 16, 2011

कांदे पोहे

भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी
हळदीसाठी आसुसलेले हळवे मन अन कांति
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे

नात्यांच्या या बाजारातून विक्रेत्यांची दाटी
आणि म्हणे तो वरचा ठरवि शतजन्माच्या गाठी
रोज नटावे रोज सजावे धरून आशा खोटी
आले मिटूनी लाजाळुपरी पुन्हा उघडण्यासाठी
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे

दूर देशीच्या राजकुमारा ची स्वप्ने पाहताना
कुणीतरी यावे हळूच मागुन ध्यानी मनि नसताना
नकळत आपण हरवून जावे स्वतास मग जपताना
अन मग डोळे उघडावे हे दिवास्वप्न पहाताना
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे

भुतकाळच्या धुवून अक्षता तांदुळ केले ज्यांनी
आणि सजवाला खोटा रुखवत झाडांच्या फाद्यांनी
भविष्य आता रंगवण्याचा अट्टहास ही त्यांचा
हातावरच्या मेंदीवर ओतून लिंबाचे पाणी
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे

गीत/संगीत : अवधुत गुप्ते
स्वर् : सुनिधी चौहान

विसरु नको श्रीरामा मला...


विसरु नको श्रीरामा मला
मी तुझ्या पाऊली जीव वाहिला, प्रिया

किती जन्म झाले, तुझी प्रेमिका मी
कितीदा नव्याने तुला भेटले मी
तुझी सावली झाले, घेऊनी हिंडले सतीचा वसा, प्रिया

तू सांब भोळा, उमा पार्वती मी
तू कृष्ण काळा, तुझी राधिका मी
युगायुगांचे नाते आपुले वेगळे, जुळे श्यामला, प्रिया

गायक :लता मंगेशकर
गीत :सुधीर मोघे
संगीत :पं. हृदयनाथ मंगेशकर

Sunday, May 15, 2011

नसतेस घरी तू जेव्हा...

नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन्‌ चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकुन वारा
तव गंधावाचून जातो

तव मिठीत विरघळणार्‍या
मज स्मरती लाघववेळा
श्वासाविण ह्रुदय अडावे
मी तसाच अगतिक होतो

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा?
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो

गीत : संदीप खरे

मेंदीच्या पानांवर...



मेंदीच्या पानांवर मन अजून झुलते ग
जाईच्या पाकळ्यांस दव अजून सलते ग

झुळझुळतो अंगणात तोच गार वारा ग
हुळहुळतो तुळशीचा अजुन देह सारा ग

लदबदल्या आवळीस अजुन तीच घाई ग
चिमणीच्या दातांची चव अवीट बाई ग

अजुन तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग
अजुन तुझ्या डोळ्यांतिल मोठेपण कवळे ग

आज कसे आठवले बघ तुलाच भलते ग
मेंदीच्या पानांवर मन अजून झुलते ग

गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर

ऐरणीच्या देवा तुला...



ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे  || धृ ||

लेऊ लेणं गरीबीचं, चनं खाऊ लोखंडाचं
जीणं होऊ आबरुचं, धनी मातूर माझ्या देवा, वाघावानी असू दे

लक्षीमीच्या हातातली चवरी व्हावी वर खाली
इडा पीडा जाईल, आली किरपा तुझी भात्यातल्या सूरां संग गाऊ दे

सुख थोडं, दुःख भारी, दुनिया ही भली बुरी
घावं बसंल घावावरी, सोसायाला झुंजायाला, अंगी बळ येऊ
ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे

गायक - लता मंगेशकर
गीतकार - जगदीश खेबुडकर
संगीतकार - आनंदघन