Wednesday, June 29, 2011

झाडाखाली बसलेले - गारवा

झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले
चिंब मनी आज पुन्हा, आठवूनी मेघ जुना कोणी भिजलेले

वार्‍यातूनी, पाण्यातूनी, गाण्यातूनी भिजला
पाऊस हा माझा तुझा, आता ऋतू सजला
गंध असे, मंद जणू, होऊनिया थेंब जणू, आता टपटपले

पाऊस हा असा, झाला वेडापिसा, पानाफुलांत पुन्हा
खूप जुन्या आज पुन्हा, डोळयात थेंबखुणा
होऊनिया धुंद खरे, आज पुन्हा गार झरे येथे झरझरले

काही कळया, काही फूले, काही झूले हलले
काही मनी, काही तनी, काही नवे फुलले
वावरुनी आज कुणी, सावरुनी आज कुणी, येथे थरथरले

गीत: मिलिंग इंगळे

Tuesday, June 28, 2011

रिमझिम धून... - गारवा

रिमझिम धून, आभाळ भरुन
हरवले मन, येणार हे कोण ?

मन फुलांचा थवा, गंध हा हवा हवा
वाहतो वारा नवा, जुन्यात हरवून

गूज मनीचे मनाला, आठवूनी त्या क्षणाला
सांगावे का माझे मला, उगाच मनात बावरुन

वार्‍यात गाणे कुणाचे, गाण्यात वारे मनाचे
मनाच्या वार्‍यात आता, सुरात तुला मी कवळून ...



गीत: मिलिंग इंगळे

पुन्हा पावसालाच सांगायचे... - गारवा

पुन्हा ढग दाटून येतात, पुन्हा आठवणी जाग्या होतात
तिचे माझे सारेच पावसाळे, माझ्या मनात भिजून जातात

पुन्हा पाऊस ओला ओला, पुन्हा पाऊस बांधून झूला
तिच्याकडले उरले झोके, परत करतो माझे मला
पुन्हा पाऊस खूप ऐकतो, पुन्हा पाऊस खूप बोलतो
त्याच्या माझ्या गप्पांमधले तिचे थेंब अलगद झेलतो

पुन्हा पावसाला सांगतो मी, पुन्हा पावसाशी बोलतो मी
माझे तिचे आठवण थेंब, पुन्हा पावसालाच मागतो मी

--------------------------------------------------------------------------------------------
  
पुन्हा पावसालाच सांगायचे
कुणाला किती थेंब वाटायचे

मऊ कापसाने दरी गोठली
ढगांनी किती खोल उतरायचे

घराने मला आज समजावले
भिजूनी घरी रोज परतायचे

तुझी आसवे पाझरु लागता
खर्‍या पावसाने कुठे जायचे



गीत: मिलिंद इंगळे

पाऊस दाटलेला... - गारवा

पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा
दारास भास आता, हळूवार पावलांचा

गवतास थेंब सारे बिलगून बैसलेले
निथळून साचलेले, तळवा भिजेल आता, हळूवार पावलांचा

झाडावरुन पक्षी, सारे उडून गेले
जेव्हा भिजून गेले, पंखात नाद त्यांच्या हळूवार पावलांचा

पाऊल वाट सारी, रात्री भिजून गेली
विसरुन तीच गेली, ओला ठसा कुणाच्या हळूवार पावलांचा



गीत: मिलिंद इंगळे

गारवा...


उन जरा जास्त आहे, दर वर्षी वाटत
भर उन्हात पाऊस घेऊन, आभाळ मनात दाटत

तरी पावले चालत राहतात, मन चालत नाही
घामा शिवाय शरीरात, कोणीच बोलत नाही

तितक्यात कुठून एक ढ़ग सुर्यासमोर येतो
तितक्यात कुठून एक ढ़ग सुर्यासमोर येतो
उन्हा मधला काही भाग पंखांखाली घेतो
वारा उनाड़ मूला सारखा सैरा वैरा पळत रहातो
पाना फूला झाडांवरती छ्परावारती चढूंन पाहतो

दूपार टळून संध्याकाळ चा सुरु होतो पुन्हा खेळ, उन्हा मागुं चालत येते गार गार कातरवेळ
चक्क डोळयां समोर रुतु कूस बदलून घेतो, पावासा आधी ढ्गां मधे कुठुन गारवा येतो ...


--------------------------------------------------------------------------------------------

गारवा, वार्‍यावर भिरिभर पारवा, नवा नवा
प्रिये नभात ही चांदवा नवा नवा

गवतात गाणे झूलते कधीचे
हिरवे किनारे हिरव्या नदीचे
पाण्यावर सरसर काजवा नवा नवा
प्रिये मनात ही ताजवा नवा नवा

आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे
अंगभर थर थर थर नाचवा नवा नवा
प्रिये तुझा जसा गोडवा नवा नवा 

गीत: मिलिंद इंगळे