Tuesday, July 5, 2011

देव माझा विठु सावळा..

देव माझा विठू सावळा..
देव माझा विठू सावळा..

माळ त्याची माझी या गळा
देव माझा विठू सावळा ||

विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी
भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा ||

साजिरे रूप सुंदर, कटी झळके हे पितांबर
कंठात तुळशीचा हार कस्तुरी टिळा ||

भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो
रंगून जाई भक्तांचा पाहुनी लळा ||

No comments:

Post a Comment