Tuesday, February 28, 2012

श्री मारुती स्तोत्र

भीमरुपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती|
वानरी अंजनीसुता, रामदुता प्रभंजना||||

महाबली प्राणदाता, सकळा उठवी बळे|
सौख्यकारी शोकहंता, धूर्त वैष्णव गायका|| ||

दीननाथा हरीरुपा, सुंदरा जगदंतरा|
पातालदेवता हंता, भव्य सिंदुर लेपना|| ||

लोकनाथा, जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना|
पुण्यवंता, पुण्यशिळा, पावना परितोषका|| ||

ध्वजांगे उचली बाहो, आवेशे लोटला पुढे|
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखता कांपती भये|| ||

ब्रम्हांडे माईली नेणों आंवाळे दंतपंक्ती|
नेत्राग्नी चालील्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळे|| ||

पुच्छ ते मुर्डीले माथा, किरीटी कुंडले बरी|
सुवर्ण कटी कांसोटी , घंटा किंकिणी नागरा|| ||

ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपात़ळु|
चपळांग पाहता मोठे, महाविद्युल्लतेपरी|| ||

कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावे उत्तरेकडे|
मंद्रादीसारखा द्रोणु क्रोधे उत्पाटिला बळे|| ||

आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती|
मनासी टाकीले मागे, गतिसी तुळणा नसे|| १०||

अणुपासुनि ब्रम्हांडाएवढा होत जातसे,
तयासी तुळणा कोठे, मेरुमंदार धाकुटे || ११||

ब्रम्हांडाभोवते वेढे, वज्रपुच्छे करु शके|
तयासी तुळणा कैंची, ब्रम्हांडी पाहता नसे|| १२||

आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा|
वाढता वाढता वाढे, भेदिले शून्यमंडळा|| १३||

धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्रसमस्तही|
पावती रुपविद्यादी स्तोत्रपाठेकरुनिया|| १४||

भूतप्रेतसमंधादि रोगव्याधीसमस्तही|
नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने|| १५||

हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी|
दृढदेहो, निसंदेहो, संख्याचंद्रकळागुणे|| १६||

रामदासी अग्रगण्यु, कपीकुळासी मंडणु|
रामरुपी अंतरात्मा, दर्शने दोषनासती|| १७||

|| इती श्री रामदासकृतं संकटनिरसनं मारुतीस्तोत्रं सम्पूर्णं ||

No comments:

Post a Comment