Tuesday, March 6, 2012

होलिकादहन कथा

       
         पूर्वी राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षसराजा होता. तो स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार असे, त्यांना तो त्रास देत असे. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून नारायणाचा परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्णूच्या नावाचे नारायण-नारायण असे नामस्मरण करीत असे. परंतु हिरण्यकश्यपूला हे मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येकवेळी तो अयशस्वी ठरला.    

        अखेरीस हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा, भक्त प्रलाहादाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली. होलिका हे तिचे नाव. ती राक्षसीप्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे वरदान होते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता, अग्नी तिला जाळू शकणार नाही म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसविले. आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले, आणि ती चिता पेटवली, परंतु, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झाली. आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही.

        पुढे त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा वध केला.

होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्यादिवशी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

No comments:

Post a Comment